चंद्रपुरात मंगळवारी विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती करणार आंदोलन

स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती, चंद्रपूरच्या वतीने 14 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह” आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
MPSC ऑनलाईन परीक्षा व नॉर्मलायझेशन, NEET व TET पेपरफुटी प्रकरण, महाज्योती, बार्टी व टीआरटीआयच्या निधीतील कपात, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहांची गरज तसेच शासकीय नोकऱ्यांमधील वाढते कंत्राटीकरण या महत्त्वाच्या विषयांवर समिती संघर्ष करणार आहे.
विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा आणि रणनीतीही यावेळी जाहीर करण्यात आली. स्पर्धा परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व्हावी, पेपरफुटीला आळा घालावा, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि शासकीय भरती प्रक्रिया नियमित व पारदर्शकपणे राबवावी, अशी मागणी करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *