एअर शो दरम्यान तेजस कोसळले;मेक इन इंडियाला दुबईत मोठा धक्का

दुबई, दि. २१ वृत्तसंस्थादुबई एअर शो दरम्यान मोठा अपघात झाला आहे. एअर शो सुरु असताना भारतीय बनावटीचे तेजस लढाऊ विमान क्रॅश झाले आहे. एअर शो सुरु असताना हे विमान क्रॅश होऊन वेगाने खाली आले, घटनास्थळावरून धूर आणि आगीचे लोळ उठल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, या विमानाचा पायलटही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे भारत सरकारला मेक इन इंडिया मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दुबईमध्ये सुरु असलेल्या एअर शोदरम्यान हा अपघात घडला आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी हा अपघात घडला आहे. एअर शो सुरु असतानाच ही दुर्घटना घडली आहे. हे विमान अचानक जमिनीच्या दिशेने तीव्र वेगात खाली आले, अन् कोसळले. घटनास्थळावरून मोठे आगीचे आणि धुराचे लोट उठल्याचे पहायला मिळाले.दरम्यान, “आज दुबई एअर शोमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान भारतीय हवाई दलाच्या तेजस विमानाचा अपघात झाला. या अपघातात वैमानिकाला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे भारतीय हवाई दलाला अतिशय दुःख झाले असून या दुःखाच्या काळात ते शोकाकुलकुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी न्यायालयीन चौकशीची स्थापना करण्यात येत आहे,” असे भारतीय हवाई दलाने निवेदनात म्हटले आहे.हा प्रकार अशा वेळी घडला आहे, जेव्हा भारतीय हवाई दल हे विमानिय पत्रात रूप असलेल्या $LCA$ ‘तेजस’ $Mk$ १ $A$ डेरिग्लटरचा तापसात समावेश करण्याची तयारी करत आहे. यापूर्वी, एक इंजिनअसलेले तेजस लढाऊ विमान १३ मार्च २०२४ रोजी राजस्थानमधील जैसलमेरजवळ कोसळले होते. संरक्षण निर्मिती क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेकडे होत असलेल्या प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी त्रिसंवा सरावामध्ये सहभागी झाल्यानंतर काही मिनिटांतच हा अपघात झाला होता. त्यावेळी वैमानिकाने वेळेवर पॅराशूटने उडून करीत स्वतःचा जीव वाचवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *