चंद्रपूर जिल्ह्यात अनिर्बंध आणि अवैध रेती तस्करीचा कहर, जुनोना जंगलात रेतीभरल्या हायवाने दिली भल्या थोरल्या सांबर प्राण्याला धडक, सांबर गंभीर जखमी

चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगलात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी 6 च्या सुमारास रेती वाहून नेणाऱ्या हायवा ट्रॅक ने सांबराला जोरदार धडक दिल्याने तो गंभीररित्या जखमी असून सतत रक्तस्त्रावं सुरु आहे. सांबराचा जबडा पूर्णपणे तुटला असून, उजवा पोटाचा मांडीचा भाग व मान पूर्ण रस्त्यावर घासून रक्तस्त्रावं सुरु आहे. गंभीर बाब म्हणजे सांबराचे मागचे दोन्ही पाय तुटले असून वाचण्याची शक्यता फार कमी आहे. पुढील उपचारासाठी त्याला ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटर ला नेण्यात आले आहे. ही घटना कक्ष क्रमांक 488 मध्ये वनविकास महामंडळाच्या जंगलात घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *