चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील ५१ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल ६६ लाख १४ हजार ८८६ रुपयांचे गांजा, एमडी पावडर आणि गर्द न्यायालय व संबंधित समितीच्या परवानगीनंतर नागपूर येथील अत्याधुनिक प्रकल्पात पर्यावरणपूरक पद्धतीने जाळून नष्ट करण्यात आले. या कारवाईत ३१० किलोहून अधिक गांजा, ४२० ग्रॅम एमडी आणि ७६ ग्रॅम गर्दचा समावेश असून, अमली पदार्थांविरोधातील कठोर मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे चंद्रपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
