चंद्रपूर : शिवसेना उबाठा गटाचे 11 तर काँग्रेसच्या 2 संचालकांनी कालच भाजपात केला होता प्रवेश, या प्रवेशानंतर भाजपचा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवरही ताबा, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भास्कर ताजणे यांच्यावर काही दिवसांपूर्वी आणला होता अविश्वास प्रस्ताव, त्यानंतर भास्कर ताजणे यांनी दिला होता राजीनामा, त्यामुळे आज अध्यक्षपदा साठी झालेल्या निवडणुकीत राजेंद्र डोंगे यांची 13 विरुद्ध 5 मतांनी निवड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपची एक हाती सत्ता
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. शिवसेना (उबाठा गट) यांची सत्ता उलथवून भाजपच्या राजेंद्र डोंगे यांची सभापती पदावर निवड करण्यात आली. नुकतेच शिवसेना उबाठा गटाचे 11 व काँग्रेसचे 2 संचालक भाजपात दाखल झाले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले.
काही दिवसांपूर्वी अध्यक्ष भास्कर ताजणे यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राजेंद्र डोंगे यांची 13 विरुद्ध 5 मतांनी निवड झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या प्रयत्नांना या सत्तांतरात मोठे यश मिळाले असून आता भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे.
