कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या तालुका समूह संघटकाला 5 हजार रु. ची लाच घेताना अटक
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड घातली आहे. या कार्यालयात कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या तालुका समूह संघटकाला 5 हजार रु. ची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. लाचखोर समूह संघटकाच्या अधीनस्थ असलेल्या तक्रारदार कर्मचाऱ्याचे मानधन देयक काढून देण्यासाठी त्याने ही लाच मागितली. सुदेश महाडोळे असे आरोपीचे नाव आहे. प्रोत्साहन भत्ता बिलाची तपासणी करत ते मंजूर केल्याने त्याने ही लाच मागणी करत स्वीकारली. प्रकरणाचा पुढील तपास एसीबी करत आहे.
