अखेर धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी आपल्याच गटनेत्याच्या निषेध करत केला सभात्याग, भाजपातील खदखद देखील आली नजरेस, पहिल्यांदाच नगरसेवक झालेले रवी लोणकर यांनी आपल्याला स्थायी मध्ये संधी न दिल्याने सभागृह आणि बाहेर देखील व्यक्त केली नाराजी
चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समितीतील 16 सदस्यांच्या नावांची निवड करण्यासाठी मनपाच्या विशेष सभेचे आयोजन पालिका मुख्यालयात करण्यात आले. यात महापौरानी बंद लिफाफ्यात आलेल्या नावांची घोषणा करण्यात आली. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर गटाला यात मोठा धक्का बसलाय. काँग्रेसकडून स्थायी समितीत नियुक्त करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये एकाही धानोरकर समर्थकाला जागा नसून सातही जागी विजय वडेट्टीवार समर्थकांची नावे देण्यात आली आहेत.
काँग्रेस पक्षाकडून या 7 नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे.
वसंता देशमुख
सचिन कत्याल
राजेश अडूर
संजीवनी वासेकर
चंदा वैरागडे
सोफिया तवंगर
विनोद लभाने
————-
तर भाजपने
सुभाष कासमगोट्टूवार
संजय कंचर्लावार
पुष्पा उराडे
सारिका संदूरकर
प्रज्वल कडू
सविता सरकार
———————
शिवसेना उबाठा तर्फे
मनस्वी गि-हे
श्रुती घटे
———
आणि शेकाप तर्फे
प्रदीप देशमुख
——————
यांना संधी देण्यात आली आहे. या नावांची घोषणा होताच अपेक्षित नावे नसल्याने खा. धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी आपल्याच गटनेत्याविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करत सभात्याग केला.
पक्षाकडून आपले नाव निश्चित झाले असताना भाजपचे गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांनी आपले नाव दिले नाही असे सांगत भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी लोणकर यांनी आपल्याच गटनेत्यावर रोष व्यक्त केला. सभागृहात रोष व्यक्त करतच लोणकर यांनी बाहेरही आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले.
स्थायी समिती सदस्यांची नावे देण्यासाठीच आयोजित केलेली ही सभा मात्र विविध कारणांनी गाजली. भाजपमधील असंतोष जसा दिसला तशीच काँग्रेस मधील खदखदही या निमित्ताने पुढे आली. या पुढच्या काळात एका मताने सत्ता आल्याने सभागृह असो वा स्थायी समिती ,सत्ता राबवणे तारेवरची कसरत राहणार आहे.
