चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयाम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

चंद्रपूर जिल्ह्याला सलग तिसऱ्या वर्षी मिळाला सन्मान, सोयाम यांचे जिल्हाभरातून अभिनंदन

महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्यसेवेची मशाल तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयाम यांचा आज नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस 2026 निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात, राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांच्या हस्ते उज्ज्वला सोयाम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्याला सलग तिसऱ्या वर्षी हा सन्मान मिळाला आहे हे विशेष.

या विशेष सोहळ्यात देशभरातून निवडक एकूण 15 नर्सिंग अधिकारी कर्मचारी यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या उज्ज्वला सोयाम यांनी गेल्या 24 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात अत्यंत समर्पित सेवा दिली आहे. विशेषतः नक्षल प्रभावित आणि आदिवासी भागामध्ये कन्याभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि आरोग्य जनजागृतीमध्ये घेतलेला पुढाकार गौरवास्पद आहे. नैसर्गिक आपत्ती प्रवण क्षेत्र असो किंवा कठीण भौगोलिक परिस्थिती, उच्च जोखीम असलेल्या गर्भवती मातांची आणि बालकांची काळजी घेण्यात त्यांनी नेहमीच तत्परता दाखवली आहे. या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र आणि 1 लाख रुपये रोख असे आहे. सोयाम यांचे जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *