चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्लीच्या जंगलात रेल्वेच्या धडकेत अस्वलाचे दोन बछडे ठार

रेल्वेच्या धडकेत अस्वलाची दोन बछडे ठार झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली वनविभागांतर्गत केळझर येथील कक्ष क्रमांक ४३२ मध्ये रात्रीच्या सुमारास चंद्रपूर-गोंदिया रेल्वे लाईनवर घडली. यात प्रत्येकी एक नर व मादीचा समावेश आहे.

चंद्रपूर ते गोंदिया रेल्वे लाईनवर मोठ्या प्रमाणात रेल्वे धावतात. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वेलाईनच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर दिसून येतो. दरम्यान, अस्वलाची पिल्ले नर व मादी यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच चंद्रपूर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली. टीटीसीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार यांनी मृत अस्वलाच्या पिलांचे मध्यवर्ती काष्ठ भांडार चिचपल्ली येथे शवविच्छेदन केल्यानंतर दहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *