चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात 2 मुलींची सोशल मीडियावरून ओळख झाल्यावर संपर्क वाढवत 4 आरोपी युवकांनी केला अत्याचार

अत्याचाराचे व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत केले ब्लॅकमेलिंग

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात 2 मुलींची सोशल मीडियावरून ओळख झाल्यावर संपर्क वाढवत 4 युवकांनी अत्याचार केला. या अत्याचाराचे गुप्तपणे व्हिडीओ काढून ते वायरल करण्याची धमकी देत मुलींना ब्लॅकमेलिंग केले. यात एक अल्पवयीन तर दुसरी पिडीत 19 वर्षाची असल्याची माहिती आहे. प्रकरणात 4 आरोपींनी मोठी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने उकळल्याची माहिती आहे. घटनेत पोलिस तक्रार दाखल झाली असून पोलीस मुलींना विश्वासात घेऊन या संवेदनशील प्रकरणाचा तपास करत आहेत. या आरोपीनी आणखी काही मुलींना लक्ष्य करून ब्लॅकमेलिंग करत रक्कम उकळल्याचा संशय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *