संभाजीनगरसह 12 जि.प., 125 पं.स.चे आज मतदान:सुनेत्रा पवारांनी मतदानाचा हक्क बजावला

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ही प्रक्रिया पार पडेल. अजित पवार यांच्या निधनामुळे ५ फेब्रुवारी रोजी होणारे हे मतदान पुढे ढकलण्यात आले होते.

सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल, तर 9 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. प्रत्येक मतदाराला पांढऱ्या ईव्हीएमवर जिल्हा परिषदेसाठी आणि गुलाबी ईव्हीएमवर पंचायत समितीसाठी अशी दोन मते द्यायची आहेत. एकूण 2 कोटींहून अधिक मतदार असून 25,471 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या 731 गटांसाठी व पंचायत समितीच्या 1,462 गणांसाठी असे एकुण 7,438 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी 1.28 लाख कर्मचारी नियुक्त केल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *