विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या सौजन्याने नागभीड तालुक्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध

आरोग्य सेवेला मोठा आधार – नागरिकांत समाधान,रुग्णवाहिकेचे लोकार्पण

नागभीड तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असल्याची माहिती काँग्रेस पदाधिकारी तथा लक्ष्मी नागरी पतसंस्था अध्यक्ष विनोद बोरकर यांनी विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार यांना दिली. व रुग्णवाहिकेची मागणी केली यावर जनतेच्या आरोग्य सेवेसाठी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सौजन्याने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. व रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले.ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, हा मानवतावादी हेतू ठेवून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

नागभीड तालुक्यात अनेक गावांमध्ये तातडीच्या वैद्यकीय सुविधांचा अभाव असून, गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात नेताना मोठी अडचण निर्माण होत होती. अशा परिस्थितीत ही रुग्णवाहिका ‘जीवनदायी ठरावी’ अशीच आहे. आता अपघात, प्रसूती, गंभीर आजार अशा प्रसंगी रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या रुग्णवाहिकेमुळे गोरगरीब, शेतकरी, मजूर व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आरोग्य सेवेत आमूलाग्र सुधारणा होणार आहे. जनतेच्या दुःखात धावून जाणे हेच खरे लोकनेतृत्व या भूमिकेतून विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी हा उपक्रम राबविल्याचे दिसून येते.

यावेळी काँग्रेस पदाधिकारी तथा लक्ष्मी नागरी पतसंस्था अध्यक्ष विनोद बोरकर, ब्रम्हपुरी उपनगराध्यक्ष डॉ . नितीन उराडे, माजी सभापती प्रफुल खापर्डे, चिमूर काँग्रेस पदाधिकारी विजय गावंडे, जुनैद खाँन यांचेसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागभीड तालुक्यातील नागरिकांनी आ. वडेट्टीवार यांच्या या सामाजिक व लोकहिताच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, “जनतेचा नेता जनतेसोबतच” अशा भावना व्यक्त केल्या.
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारा हा उपक्रम भविष्यात अनेक जीव वाचविण्यास कारणीभूत ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *