चंद्रपूर शहरालगत वनविभागाने प्रादेशिक जंगलात सुरू केलेल्या नव्या लोहारा व्याघ्र सफारीचा गणराज्यदिनी प्रारंभ करण्यात आला. पालकमंत्री डॉ. उईके, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
जिल्ह्यातील वनवैभव व वन्यजीव वैविध्य बघण्यासाठी पर्यटकांना अगदी शहराजवळ नवा पर्याय उपलब्ध झाला. डॉक्टर उईके व मुनगंटीवार यांनी नव्या व्याघ्र सफारीचा आनंदही घेतला.
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारच्या 50 पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या योजनेत ताडोबाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती याप्रसंगी दिली. सोबतच बल्लारपूर येथे सागवान लाकडाशी संबंधित नवे म्युझियम साकारण्याचाही मनोदय बोलून दाखविला.
