चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड ,दिग्गज काँग्रेस नेते माजी खासदार नरेश पूगलीया यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावरून केले रा. कॉ. अजित पवार गटाच्या चाळीस उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन

पुगलिया आपल्या समर्थकांना रा. कॉ..अजित पवार गटाकडून रिंगणात उतरविण्याची होती दबक्या आवाजात चर्चा, पडद्यामागे राहून डाव रचणारे पुगलिया प्रथमच आले पुढे

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड पुढे आली आहे. दिग्गज काँग्रेस नेते माजी खासदार नरेश पूगलीया यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावरून रा. कॉ. अजित पवार गटाच्या 40 उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

मनपा निवडणूक सुरू झाल्यापासून नरेश पुगलिया समर्थक अजित पवार गटाकडूम मनपा निवडणुकीत उमेदवार उतरविणार असल्याची दबक्या आवजात चर्चा होती. मात्र पडद्यामागे असणारे पुगलिया आज प्रथमच सोशल मीडियातून पुढे आले. त्यांनी काँग्रेसशी संबंधीत माजी नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यासह 40 उमेदवार घड्याळ बोधचिन्हावर रिंगणात असल्याचे स्पष्ट केले.

या आघाडीला गोंडवाना गणतंत्र पक्षाने पाठींबा दिलाय. गेल्या 8 वर्षात मनपात माजलेली बजबजपुरी आपले उमेदवार संपवतील अशी ग्वाही पुगलिया यांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुगलिया यांनी आपल्या गटाचा जाहीरनामा देखील प्रकाशित केलाय. राज्यात कुठेही काँग्रेस आणि अजित पवार गट असा मेळ नसताना माजी काँग्रेस खासदार पुगलिया यांच्या खेळीने कॉंग्रेसपुढच्या अडचणी वाढविल्या आहेत. अशा रीतीने मतदान पुढ्यात असताना काँग्रेसमधील दुफळी उफाळून पुढे आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *