कमिशन खोरी व खोटारडेपणा हाच भाजपचा खरा चेहरा…

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथून रोड शोला सुरवात करण्यात आली. यावेळी माजी मंत्री वसंतजी पुरके, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेस नेते विनायक बांगडे, प्रवीण पडवेकर, जिल्हा सचिव प्रमोद बोरीकर ,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, डॉ. कांबळे, कुणाल चहारे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 17 चे उमेदवार आकाश मानकर, गुंजन येरमे, महानंदा वाळके, प्रभाग क्रमांक 16 चे उमेदवार करिष्मा जंगम, अनिता चौखे, चंदा वैरागडे, प्रभाग क्रमांक 13 चे विनोद लभाने , छाया खारकर, ललिता रेवल्लीवार, रामनरेश यादव उपस्थित होते. 

सदर रोड शो रॅली आंबेडकर नगर येथून हिंदुस्तान लालपेठ प्रभागातून नागरिकांना हस्तांदोलन व उमेदवारांच्या कुशल कार्याची माहिती देत बाबुपेठ प्रभागात रॅलीचा सभेने समारोप करण्यात आला.

भाजप नेते चंद्रपूर शहराच्या विकासाच्या थापा मारत आहेत हा त्यांचा अत्यंत मोठा खोटारडेपना असून शहराला अमृत योजना व भूमिगत गटार योजनेचा जो कोट्यावधींच्या विकासनिधी प्राप्त झाला त्यात प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला. कमिशनखोरी झाली, शहरातील रस्ते रखडले, सांडपाणी विल्हेवाट नाही, पथदिवे नाही, महागाई वाढली, रोजगार मिळत नाही. आता महानगर पालिकेच्या निवडणूकिच्या तोंडावर जमिनीचे स्थायी पट्टे देणार अशा घोषणा देत आहे.

मागील 10 वर्षात नागरिकांच्या पट्टे संदर्भात तिळमात्र शब्द काढला नाही. म्हणून या सर्व बाबींचा विचार लक्षात घेऊन या भ्रष्ट भाजप सत्ताधाऱ्यांना आपण येत्या 15 तारखेला काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतदान करून चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेवर पाठवा. आणि स्वच्छ आणि सुंदर चंद्रपूर निर्माणामध्ये आपला सहभाग दर्शवा. असे आवाहन केले. या आयोजित रोडशोला हजारोंच्या संख्येने महिला भगिनी, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *