चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गादेवी विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान अचानक जनरेटरचा स्पोट झाल्याने दोन महिलांसह सात जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील विसलोन गावातील ही घटना असून दोन गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
विसर्जन मिरवणुकी दरम्यान जनरेटर मधील डिझेल संपल्यामुळे कोणीतरी त्यात डिझेल टाकले मात्र जनरेटर गरम असल्यामुळे डिझेल टाकताना त्याचा स्फोट झाला. जनरेटर जवळ त्यावेळी उभ्या असलेल्या चार महिलांसह सात जण यात जखमी झाले.
