चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराजवळ बोरगाव येथे खाजगी इथेनॉल प्रकल्पात स्फोटानंतर आगडोंब

दूरवरून दिसत आहेत आगीच्या ज्वाळा,आसपासच्या परिसरातील अग्निशमन यंत्रणांचे बंब घटनास्थळी रवाना, जीवितहानी नाही

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराजवळ बोरगाव येथे रामदेवबाबा solvent नामक खाजगी इथेनॉल प्रकल्पात स्फोटानंतर आगडोंब नजरेस पडत आहे. आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत आहेत. आसपासच्या परिसरातील अग्निशमन यंत्रणांचे बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. आगीचे कारण मात्र अज्ञात आहे.

या ठिकाणी 1.25 लाख लिटर इथेनॉल साठा होता अशी माहिती मिळाली आहे. प्राथमिक प्रतिसाद पथक प्रकल्पात दाखल झाले आहे. जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती।प्रशासनाने दिली आहे. लगतच्या झिलबोडी- बोरगाव- उदापूर या 3 गावात नागरिक हादरा बसल्याने काही काळ भयभीत झाले. काही घरांच्या काचाही फुटल्या. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *