
मुंबई: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात ऑनलाइन रमी खेळत असल्याच्या आरोपांवरून घेरले आहेत. तर, दुसरीकडे महायुती सरकारवर हनी ट्रॅपचे आरोप सुरू आहेत. अशातच आता आणखी एक मंत्री गोत्यात अडकला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या शिलेदारानं एकनाथ शिंदेच्या नेत्यावर आता निशाणा साधला आहे.
मागील काही दिवसांपासून महायुती चांगलीच बॅकफूटवर गेली असल्याचे दिसून आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यासह त्यांचे वडील, माजी मंत्री रामदास कदम आणि बंधू सिद्धेश कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. परब यांनी आता या तिघांवर सावली डान्स बार आणि वाळू प्रकरणात पुन्हा नव्याने कागदपत्रांसह आरोप करत घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
