
जळगाव: मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. आता सोन्याच्या दराने आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर, गुंतवणूकदारांची आणखी चांगल्या परताव्याची अपेक्षा वाढली आहे.
सोन्याच्या दरात उसळण…
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा परिणाम आता भारतीय बाजारपेठेवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड उसळी पाहायला मिळत असून, आज जळगावसह देशभरात सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक शिखर गाठले आहे. प्रथमच सोन्याचा दर जीएसटी वगळता प्रतिदहा ग्रॅम 1,00,000 रुपये इतका झाला आहे. जीएसटीसह हा दर 1,03,000 रुपये नोंदविण्यात आला आहे.
