चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावर वाघीण करत आहे दुचाकीस्वारांवर हल्ले, समाजमाध्यमांवर हल्ल्याचे व्हिडीओ होत आहेत वायरल

 वनविभागाने प्रथमच केली ऐतिहासिक उपाययोजना, सुमारे 1 किमी मार्गाच्या दोन्ही बाजूस लावली मजबूत जाळी

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावर वाघीण सध्या दुचाकीस्वारांवर हल्ले करत आहे. के मार्क नावाच्या या वाघिणीच्या हल्ल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर वायरल होत आहेत. या हल्ल्यात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय तर एक जोडपे कसेबसे बचावले. वनविभागाने या समस्येवर प्रथमच ऐतिहासिक उपाययोजना केली आहे.

केसलाघाट भागात सुमारे 1 किमी मार्गाच्या दोन्ही बाजूस मजबूत आणि उंच जाळी लावण्यात आली आहे. कॅमेरा ट्रॅप च्या सहाय्याने वनविभाग यावर नजर ठेवली जात आहे. सोबतच मोठ्या संख्येत वनपथके तैनात केली आहेत. वाघीण आणि तिच्या बछड्यांना इजा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय नागरिकांवर हल्ल्याची शक्यता देखील शून्य केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *