चंद्रपुरात रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग

चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली आहे. कॉम्प्लेक्समधील इंडियन मेडीकल एजन्सी स्टोअरला लागलेली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्याने आजूबाजूच्या अनेक दुकानांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात दुकाने असल्याने आग आणखी पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *