चंद्रपूर- नागपूर महामार्गावर झालेल्या एका अपघातात जखमींसाठी आ. सुधीर मुनगंटीवार देवदूत ठरले. एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. जखमींना महामार्गावर बेवारस सोडून कारचालक पसार झाला. भद्रावती शहराच्या प्रवेश सीमेवर हा अपघात घडला.
नागपुरात आपल्या नियोजित कार्यक्रमांसाठी दौऱ्यावर निघालेल्या माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा याच मार्गाने पुढे निघाला होता. आ. मुनगंटीवार यांनी हा अपघात बघताच संपूर्ण ताफा थांबवून जखमींना मदत केली. पोलीस व वैद्यकीय पथके बोलावून जखमींना रुग्णालयात पोचविले. आ. मुनगंटीवार यांनी तातडीने वेळीच केलेली मदत जखमींसाठी मोलाची ठरली.
