चंद्रपूर शहराच्या प्रथम नागरिक तथा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. संगीताताई राजेंद्र खांडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 9 वाजता विठ्ठल मंदिर प्रभाग, मजदूर चौक, चंद्रपूर येथे संपन्न झाला.
नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, विविध विकासकामे आणि विविध सार्वजनिक प्रश्नांच्या प्रभावी पाठपुराव्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यासोबतच विठ्ठल मंदिर, प्रभाग क्रमांक 15 येथे मजदूर गणेश मंडळाच्या वतीने आयोजित महाआरती कार्यक्रमालाही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक कार्यक्रमातून भक्तिभावासोबतच सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेश दिला जाणार आहे.
या कार्यक्रमाला नगरसेवक भालचंद दानव, सौ. किरण कोतपल्लीवार, भाजपा नेते श्री. रमेश भुते, बालु कोतपल्लीवार, चांदभाई, मधुकर राऊत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होते.
जनतेशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेऊन जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांना गती आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद यासाठी महापौर सौ. संगीताताई खांडेकर यांचे जनसंपर्क कार्यालय प्रभावी माध्यम ठरणार आहे.
