ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्व वाहनं ईव्ही मध्ये परिवर्तित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ताडोबा प्रशासनाला निर्देश

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्व वाहनं ईव्ही मध्ये परिवर्तित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ताडोबा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कुटुंबासह ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या 2 दिवसीय खाजगी दौऱ्यावर आले होते. या दोन दिवसात त्यांनी मोहर्लीआणि देवाडा या भागात जंगल सफारी केली आणि त्यांना छोटा दडियल आणि युवराज या प्रसिद्ध वाघांचं मनसोक्त दर्शन झालं. विशेष म्हणजे खाजगी दौऱ्यावर असताना देखील गडकरी यांनी ताडोबातील पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेतला.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी गाड्या ध्वनी आणि वायू प्रदूषण करणार नाही यासाठी विशिष्ट प्रकारच्या 300 गाड्या तयार करून देण्याची देखील गडकरींनी तयारी दर्शवली आहे. गडकरी यांनी यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे ताडोबा प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले असून या प्रस्तावासाठी गडकरी विशेष पाठपुरावा करणार आहेत. चेचीस मध्ये विशेष बदल केलेल्या ईव्ही गाड्यांमुळे स्थानिक जिप्सी चालकांच्या डिझेलवरील खर्चात मोठी बचत होईल आणि ताडोबा प्रदूषण मुक्त होण्यास मदत होईल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *