जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणाने चंद्रपूर शहरात गॅस रिफिलिंग अड्डे सुरूच, चंद्रपूर शहरातील वृंदावननगर भागात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणखी एका अड्ड्याचा केला खुलासा, एकूण 51 सिलेंडर आणि अख्खी गाडीच केली जप्त

जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणाने चंद्रपूर शहरात गॅस रिफिलिंग अड्डे सुरूच आहेत. चंद्रपूर शहरातील वृंदावननगर भागात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणखी एका अड्ड्याचा खुलासा केलाय. या अवैध टपरी गोडाऊन मध्येही घरगुती गॅस सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडर मध्ये नोझलच्या सहाय्याने गॅस भरला जात होता. एकूण 51 सिलेंडर आणि अख्खी गाडीच पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. राजस्थानी नेटवर्कचे कामगार याही अड्ड्यावर ग्राहकांना लुटत बक्कळ पैसे कमवत आहेत. गॅस वितरक- डिलिव्हरी बॉय आणि अधिकारी यांच्या साटे लोटे कारभारामुळे चंद्रपुरात घरगुती गॅस ग्राहकांची खुलेआम फसवणूक होत आहे. 10 दिवसात दुसरा अवैध रिफिल अड्डा पकडला गेल्याने पोलिसांचा थांबलेला तपास, पुरवठा आणि तहसील विभागाचा मूक पाठींबा यामुळे गॅस वितरक अनिर्बंधपणे लुटले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *