चांदा प्रांताततील ऐतिहासिक गोंड राजांच्या प्रतिकचिन्हाचे आले विकृतीकरण
आदिवासी संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा
मदमस्त हत्तीचे गंडस्थळ फोडणारा सिंह, असे चांदा प्रांतातील ऐतिहासिक गोंड साम्राज्याचे राजचिन्ह आहे. शहर आणि जिल्ह्यातील विविध पुरातन वास्तूंवर हेच चिन्ह कोरलेले आहे. एका अर्थाने सन्मानाचे राजचिन्ह असलेल्या या प्रतिकाचे विकृतीकरण झाल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे.
शहरात मोक्याच्या जागी नव्यानेच बांधण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या भिंतीवर हेच चिन्ह विकृत रुपात साकारण्यात आल्याचा आरोप होत आहे. नवे विश्रामगृह गोंड शैलीतील पुरातन वास्तूंच्या थीमवर उभारण्यात आले आहे. आता या इमारतीवर राजचिन्हाचा अपमान झाल्याचा आरोप करत
आदिवासी संघटनांनीआंदोलनाचा इशारा दिलाय.
