आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथे महाआरोग्य शिबिर संपन्न.
५२८१ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर रुग्ण विविध ५७४ शस्त्रक्रियेसाठी पात्र!
घुग्घुस, दि. ३१
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि सुदृढ आरोग्यदायी समाज निर्माण करणे हीच खरी जनसेवा आहे, याच ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत लोकनेते आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घुग्घुस येथे मागील २० वर्षांची अखंड परंपरा कायम ठेवत भव्य महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून स्थानिक प्रयास सभागृहात तब्बल ५२८१ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, तर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले ५७४ रुग्ण विविध शस्त्रक्रिया व पुढील मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत.
धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत आजारपणाचे प्रमाण वाढत असताना ऐनवेळी लागणारा वैद्यकीय खर्च सर्वसामान्यांचे कंबरडे मोडतो. अशा वेळी आरोग्याची नियमित तपासणी आणि वेळेत उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते. हाच उदात्त हेतू समोर ठेवून आमदार देवराव भोंगळे यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात हृदयविकार, नेत्ररोग, कान-नाक-घसा, दंतरोग, किडनी विकार, मधुमेह (शुगर) आणि उच्च रक्तदाब यांसारख्या विविध आजारांवर निष्णात डॉक्टरांकडून मोफत तपासणी, सल्ला व औषधोपचार करण्यात आले. या महाआरोग्य शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर आणि विनोबा भावे रुग्णालय येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकांनी आपले अमूल्य योगदान दिले.
या शिबिराला उद्घाटक म्हणून एसीसी सिमेंटचे प्लांट हेड लोकेश श्रीमल्ली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामटेके, लॉर्ड्स मेटल कंपनीचे एचआर तरुण केशवानी, अदानी समूहाचे अमर कुमार शर्मा, उपसिव्हिल सर्जन डॉ. भास्कर सोनारकर, गुरुदेव समाजाचे अध्यक्ष प्रेमलाल पारधी, चंद्रपूरचे सुप्रसिद्ध डॉ. अभिषेक दीक्षित, वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटलचे डॉ. अश्विन रडके, कॅम्प कॉर्डिनेटर डॉ. अजय ठाकरे, डॉ. हर्षल मेंढे, डॉ. हेमंत जुनेजा, डॉ. राजेश कांबळे, नगरसेविका वैशालीताई ढवस, नगरसेविका चैतालीताई सातपुते, उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष रत्नेश सिंग आणि घुग्घुसचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पडगिलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या उत्कृष्ट नियोजनातून आणि संयोजनातून हे शिबिर अत्यंत शिस्तबद्धरीत्या यशस्वी झाले.
शिबिराच्या शेवटी राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी विशेष उपस्थिती लावून शिबिराची पाहणी केली. त्यांनी उपस्थित अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना संबोधित करून उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व सर्वांचे मनापासून आभार मानले. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना ‘सेवेचे दुसरे रूप’ म्हणून गौरवत त्यांनी भाऊंना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना केली.
या महाआरोग्य शिबिराच्या भव्य यशासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री अमोल थेरे, नगरसेविका सौ. वैशाली ढवस, सौ. चैताली सातपुते, सिनु इसरप, संजय जोगी, विवेक तिवारी, धनराज पारखी, सुरेंद्र भोंगळे, नितीन काळे, तुलसीदास ढवस, सचिन नांदे, गणेश कुटेमाटे, उमेश दडमल, अजगर खान, सौरभ घोडके, योगेश घोडके, रवी घोडके, शिवम घोडके, प्रणय काटवले, सुधाकर आसुटकर, विकी चिवंडे, राहुल बोबडे, कोमल ठाकरे, गणेश राजुरकर, बबलु सातपुते, रोहित जयस्वाल, रत्नेश सिंग, बंटी बेगल, रमेश कोटकुला, किशोर जाधव, सचिन गोखरे, श्रीकांत बहादुर, हेमंत कुमार, मानस सिंग, पियूष भोंगळे, शंकर सिद्दम, सागर तांडा, रवी बोबडे, दुर्गेश ठेपाले, सुधाकर भोंगळे, सुशिल डांगे, हेमंत पाझरे, सिनु कोट्टूर, वामन डाहुले, राहुल गौरकर, सचिन पाऊलपुदे, सचिन नागपुरे, प्रवीण ठाकरे, संदीप ठाकरे, बंटी भोस्कर आणि राजु चटकी यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
