संबोधन ट्रस्ट च्या माध्यमातून तृतीपंथीयांच्या सक्षमीकरणा साठी काम केले जाते. कायम तिरस्कार, हेटाळणी, अपमान यांना समोर जात असलेल्या तृतीय पंथीय समाजच्या वेदना समजून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या नम्रता आचार्य- ठेमस्कर यांनी संबोधन ट्रस्ट च्या कार्यालयात भेट दिली. सन्मानाने जीवन जगण्यासाठी कामाची गरज आहे, आम्हाला काम हवे, आम्ही कोणतेही काम करू अशा भावना यावेळी उपस्थित तृतीपंथी समुदायाने व्यक्त केल्या.
तृतीपंथीयां साठी च्या योजनांची माहिती घेऊन त्या योजनांच्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी ठेमस्कर यांनी दिले. त्यासाठी शासन आणि प्रशासन या दोन्हींची आपण मदत घेऊ असे आश्वासन ठेमस्कर यांनी बोलतांना दिले.
समाजातील सर्व स्तरातील लोकां साठी विविध समाजपयोगी उपक्रम अनेक जण चालवत असतात. पण तृतीपंथीय या सामाजिक घटकांकडे मात्र कायम दुर्लक्ष होत. हे लक्षात घेऊनच नम्रता आचार्य- ठेमस्कर यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस संबोधन ट्रस्ट मध्ये तृतीय पंथीयांसोबत साजरा केला. यावेळी केक कापून, तसेच साडी, छत्री, मिठाई देऊन उपस्थित तृतीय पंथीयांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संबोधन ट्रस्ट चे अध्यक्ष राजू काचोळे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंधू ताई राजगुरे, माला माणिकपुरी, रुपाली आंबटकर, सीमा धुर्वे, समिस्ता फारुकी, हीना शेख, आशा उके यांनी प्रयत्न केले.
