अनुकूल अधिवास असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत आहे. मात्र मानव-वाघ संघर्षाने नव्या समस्या उभ्या राहत आहेत. वाघ गावे आणि शेतशिवारात ग्रामस्थांवर हल्ले करत आहेत. यावर उपाय म्हणून वनविभागाने गेल्या 2 वर्षात 28 वाघ जेरबंद केले आहेत. मात्र समस्याग्रस्त वाघच पकडले गेलेत का याबाबत मात्र संदिग्धता आहे.
या सर्व वाघांना वन विभागाने चंद्रपुरातील वन्यजीव शुश्रूषा केंद्र- TTC आणि अन्य वनपरीक्षेत्रात पिंजऱ्यात जेरबंद करून ठेवण्यात आले. TTC सेंटर ला ठेवलेल्या वाघांमध्ये 6 बछडे, 4 नर वाघ व 3 मादी वाघांचा समावेश आहे. जागेच्या अभावी इतर वाघांना दुसऱ्या जिल्ह्यातील TTC सेंटरला स्थानांतरित करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा परीघ , ब्रम्हपुरी प्रादेशिक व FDCM जंगलाचा समावेश आहे. या जंगल क्षेत्रात शेकडो वाघांचा वावर आहे. वाघांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वाघाने नागरिकांवर केलेले 90% हल्ले घनदाट जंगलात झाले आहेत. यामुळे मानवाचे वाघ अधिवासावर होत असलेले अतिक्रमण स्पष्ट झाले आहे.
