चंद्रपुरातही नागरी सुविधांबाबत जेन झी चा आक्रोश ,गेले दीड वर्षापासून शहरातील मुख्य मार्गावरच्या ड्रेनेज समस्येचा करावा लागतोय सामना

जटपुरा गेट ते जिल्हा परिषद मार्गावरच्या ओव्हर फ्लो होणाऱ्या ड्रेनेजबाबत ना महापौरांचा प्रतिसाद ना आयुक्तांचा, जेन झी ने कळवळून केली प्रशासनाकडे विनंती

देशात जेन झी आपल्या मागण्याबाबत अत्यंत आग्रही असल्याचे चित्र सर्वांनीच बघितले आहे. जेन झी चा हा आक्रोश आता सभ्य स्वरूपात चंद्रपुरातही नजरेस पडत आहे. चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट ते जिल्हा परिषद मार्गावर एक मोठा नाला गेली अवरुद्ध झाल्याने यातील पाणी वर्षभरापासून रस्त्यावर वाहत आहे. परिणामी दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या मार्गावरून शहरातील आयुक्त ,महापौर, जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि शंभरावर अधिकारी रोज ये -जा करतात. वाहणाऱ्या गटाराच्या बाजूलाच हॉटेल, चांगली व्यवसायिक प्रतिष्ठाने, फळांची दुकाने आहेत.

मात्र परिस्थितीत बदल होताना दिसत नाही. या भागातच व्यवसाय करणाऱ्या काही जेन झी प्रतिनिधींनी ही समस्या मार्गी लागावी यासाठी सतत पाठपुरावा चालवला आहे. मात्र या मागणीला ना महापौर प्रतिसाद देत आहेत ना आयुक्त. केवळ बांधकामाचे साहित्य या ठिकाणी टाकून देत थातूरमातूर काम करत असल्याचा देखावा केला जात आहे. हे काम कुठवर पूर्ण होणार? स्मार्ट सिटी तयार करण्याचे जाऊ द्या मात्र एवढी गटाराची समस्या तरी सोडवा अशी कळकळीची मागणी जेन झी ने यासंदर्भात पुढे रेटली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *