चंद्रपूर जिल्ह्यातील हत्या व हत्येच्या प्रयत्नातील २७० गुन्हेगारांची पोलिस मुख्यालयात हजेरी, MPDA गुन्हेगारांना पोलीस अधीक्षकांनी दिला कडक इशारा

चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी जिल्हाभरात हत्या व हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सुमारे २७० गुन्हेगारांची झाडाझडती घेत मोठी कारवाई केली. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. चंद्रपूर जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी गुन्हेगारांना कडक शब्दांत ताकीद दिली.

यापुढे कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा केल्यास संबंधितांवर थेट एमपीडीए (MPDA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून अनेक गुन्हेगारांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *