मराठा समाजाच्या ओबीसी घटकातून आरक्षणा विरोधात एकवटला ओबीसी समाज

चंद्रपुरात निदर्शने व धरणे आंदोलनाच्या द्वारे जरांगे पाटील आणि सरकारलाही दिला इशारा

नोकरी- शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण हिरावल्यास जशास तसे उत्तर देणार

चंद्रपुरात सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज मुख्य गांधी चौकात एका धरणे व निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यात ओबीसी समाज घटकातील विविध जातीच्या नेते व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मराठा समाजाला नोकरी- शैक्षणिक व राजकीय आरक्षण ओबीसी घटकातून दिल्यास हा सवर्ण व बलाढ्य समाज ओबीसी घटकातील इतर जातींवर अन्याय करेल. राज्यात सामर्थ्यवान असलेला हा समाज पुढारलेला असून ओबीसी समाज घटकातून मराठ्यांना आरक्षण दिल्यास ओबीसी समाज जशास तसे उत्तर देईल असा इशारा आंदोलकांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *