उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री डॉक्टर उईके यांच्यासह जिल्हाधिकारी व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती, शासकीय प्रोटोकॉल नुसार शासकीय कार्यक्रम होत नसल्याने खा प्रतिभा धानोरकर यांनी कार्यक्रमातून केले वॉक आउट, व्यक्त केली तीव्र नाराजी
चंद्रपूर शहर मनपाच्या वतीने आयोजित होत असलेल्या दोन दिवसीय हिराई महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात राजशिष्टाचारावरून नाराजीनाट्य बघायला मिळाले. उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री डॉक्टर उईके यांच्यासह जिल्हाधिकारी , प्रमुख लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मात्र कार्यक्रम मनपाचा व शासकीय असल्यानंतरही मंचावर भाजप कार्यकर्त्यांचे सत्कार सोहळे होत असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर संतापल्या. हे सर्व नाट्य पालकमंत्री डॉक्टर उईके व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत घडले.
नाराज झालेल्या खा. धानोरकर यांनी आपल्या भाषणात जिल्हा प्रशासन व मनपाला खडे बोल सुनावले. कार्यक्रमात भाषणाच्या क्रमावरून राजशिष्टाचार पाळला जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर खा धानोरकर यांनी सर्व समक्ष मंचावरून वॉकआउट केले. काँग्रेसच्या मंचावर उपस्थित सर्व नगरसेवकांनीही हा धानोरकर यांच्यासह कार्यक्रम स्थळ सोडले. खा. धानोरकर यांनी घडल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी देखील व्यक्त केली . खासदारांच्या भाषणानंतर केवळ कॅबिनेट मंत्रीच बोलू शकतात मात्र या कार्यक्रमात आमदार बोलत आहेत, याबद्दल त्यांचा आक्षेप होता. चंद्रपुरात प्रथमच राणी हिराई जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन शहरातील कोहिनूर मैदानावर केले जात आहे.
