आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शीतपेयाचे वाटप

घुग्घुस: येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मंगळवार, १४ एप्रिलला सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शीतपेयाचे वाटप करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राजवळ येताच मिरवणुकीत सहभागी समाज बांधवांना नगर सेवक विवेक बोढे यांच्या हस्ते शीतपेयाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मोठया संख्येत समाज बांधवांनी शीतपेयाचा लाभ घेतला.

यावेळी भाजपाचे युवानेते अमोल थेरे, नितीन काळे, गणेश कुटेमाटे, विवेक तिवारी, मोमीन शेख, उमेश दडमल, असगर खान, सचिन नांदे, कोमल ठाकरे, विक्की चिवंडे, प्रणय काटवले, अनुपम जोगी, गणेश राजूरकर, इर्शाद कुरेशी आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *