रमजान ईद हा सण आपल्याला प्रेम, त्याग आणि एकमेकांप्रति आदराची शिकवण देतो.मुस्लीम बांधवांसोबत रमजान ईदचा आनंद साजरा करताना मनाला समाधान वाटले. आपल्या भागातील ही सर्वधर्मसमभावाची परंपरा अशीच जपली जावी, हीच माझी इच्छा आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख- दुःखात मी नेहमीच खंबीरपणे उभा आहे. रमजान ईदच्या या पवित्र दिनी सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी लाभो, हीच प्रार्थना करून ईदच्या या मंगल पर्वावर सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी माझ्यासमवेत भाजपाचे कोरपना तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरविंद डोहे, सतीश बेतावार, महेश घरोटे, विक्की ऊरकुडे, महेश शर्मा , विश्वंभर झाम, अरविंद कोरे, गणपत बुरडकर, विनोद इंगळे, रमेश चुदरी, विनोद बटलवार, गणेश आदे, पत्रकार मुमताज अली, मेहताब शेख, रफिक निजामी, रऊफ खान, मौलाना सय्यद, हसन रजा, वासुदेव वैरागडे, आशिष नामवाड, योगेश बांदुरकर यांचेसह मुस्लिम बांधव, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
