जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती रॅली

चंद्रपूर, दि. 24 : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज (दि.24) जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपूर येथून क्षयरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला मालार्पण करून टीबी मुक्त भारत अभियान 100 दिवस क्षयरोग मोहिमेचे फित कापून उद्घाटन केले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललीतकुमार पटले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, चेस्ट फिजीशियन डॉ. सौरभ राजुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. माधुरी टेंभे, डॉ. वैभव आगलावे यांच्यासह शासकीय नर्सिंग महाविद्यालय येथील जिल्हा क्षयरोग केंद्र व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रॅली समाप्तीनंतर जिल्हा क्षयरोग केंद्र येथे 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आय.एम.ए. चे सहसचिव डॉ. अप्रतिम दीक्षित उपस्थित होते. यावेळी डॉ. दीक्षित यांनी फुप्फुसांव्यतिरीक्त इतर अवयवांमध्ये होणाऱ्या क्षयरोगाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललीतकुमार पटले यांनी क्षयरोगाबाबत विस्तृत माहिती दिली.

प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत डॉ. अप्रतिम दिक्षीत यांनी क्षयरुग्णांना पोषण आहार किट दिली. कार्यक्रमाचे संचालन हेमंत महाजन व आभार डॉ. तेजस्विनी ताकसांडे यांनी मानले.

०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *