चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या कोंढाळा गावात सिमेंट प्रकल्प काम प्रारंभ झाल्याने ग्रामस्थ संतापले, महिला व ग्रामस्थांनी आंदोलन करत कंपनीचे काम पाडले बंद

आधी आमच्या मागण्यांची पूर्तता करण्याची आग्रही मागणी, काही काळ ग्रामस्थ आणि पोलिसात झाली जोरदार धुमश्चक्री

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या कोंढाळा गावात श्री सिमेंट कंपनीचे काम प्रारंभ झाल्याने ग्रामस्थ संतापले. अनेकदा पाठपुरावा करूनही कंपनीने कुठलीही दखल घेतली नाही परिणामी महिला व ग्रामस्थांनी आंदोलन करत कंपनीचे काम बंद पाडले. संपूर्ण जमीन घ्या, गावाचे पुनर्वसन करा, स्थानिक बेरोजगारांना काम द्या या मागण्यांची पूर्तता करण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान काही काळ ग्रामस्थ आणि पोलिसात जोरदार धुमश्चक्री झाली. कंपनी प्रशासनाने दडपशाही केल्यास यापुढच्या काळात प्रशासन आणि कंपनी विरोधात जोरदार संघर्ष करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *