चंद्रपूर मनपा महापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिलेल्या एमआयएमच्या अजहर शेख यांची प्रतिक्रिया, भाजपच्या संगीता खांडेकर केवळ एका मताने महापौरपदी झाल्या आहेत विजयी
निकालानंतर एकाही काँग्रेस नेत्याने एम आय एम शी सहकार्यासाठी संपर्क साधला नाही, त्यांना आमची गरज नसेल तर आम्हालाही त्यांची गरज नाही अशी प्रतिक्रिया चंद्रपूर मनपा महापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिलेल्या एमआयएमच्या अजहर शेख यांनी दिली आहे. या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर केवळ एका मताने महापौरपदी विजयी झाल्या आहेत हे विशेष. आम्ही मात्र अनेकदा त्यांना संपर्क केला. मात्र त्यांनी प्रत्येक वेळेस गरज नसल्याचे सांगितले. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत जनविकास सेनेचे पप्पू देशमुख हा अन्यायाविरोधात लढणारा चंद्रपुरातील चेहरा आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मतदान केले असेही शेख म्हणाले. निकालानंतर एकाही काँग्रेस नेत्याने आमच्याशी संपर्क केला नाही हे त्यांनी ठासून सांगितले.
