वडेट्टीवार- धानोरकर यांनी मनमानी केल्याचा आरोप, ज्यांनी काँग्रेसचा झेंडा उंचावत ठेवला त्यांना तिकीट न मिळाल्याने असंतोष
नंदू नागरकर
प्रशांत दानव
सुनीता लोढीया
अशोक नागपुरे
सकिना अन्सारी
प्रविण पडवेकर
ही आहेत काँग्रेसने तिकीट कापलेल्या नगरसेवकांची यादी.
चंद्रपूर महापालिका लढतीत कॉंग्रेसने निम्म्या विद्यमान नगरसेवकांचा तिकिटा कापल्या. दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना बाहेरचा रस्ता दाखविल्याने खळबळ उडाली आहे. आ. वडेट्टीवार- खा. धानोरकर यांच्यातील हेवेदावे यामुळे हे घडल्याचे सांगण्यात आले आहे. नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावना समजत नाहीत. ज्यांनी काँग्रेसचा झेंडा उंचावत ठेवला त्यांना तिकीट न मिळाल्याने असंतोष असून ताज्या नगर परिषद निवडणुकीत यश मिळाल्याने श्रेष्ठी कार्यकर्त्याना मोजत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. अशा चुकीच्या तिकीट वाटपामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा पराजय निश्चित असल्याचा दावा माजी शहर जिल्हाध्यक्ष आणि स्थायी समिती अध्यक्ष नंदू नागरकर यांनी केलाय.
