चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या यादीवर आमदार किशोर जोरगेवार यांचा तीव्र आक्षेप, सुधीर मुनगंटीवार यांच्या दोन वादग्रस्त समर्थकांना उमेदवारी दिल्याबद्दल जोरगेवार यांची तीव्र नाराजी

वरिष्ठापर्यंत तातडीने या उमेदवारांबद्दलचे आक्षेप जोरगेवारांनी नोंदवत केली उमेदवार बदलण्याची मागणी, एबी फॉर्म वाटप होत असलेल्या हॉटेलच्या बाहेर व्यक्त केली तीव्र नाराजी

चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या यादीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. सुधीर मुनगंटीवार यांच्या दोन वादग्रस्त समर्थकांना उमेदवारी दिल्याबद्दल जोरगेवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वरिष्ठा पर्यंत तातडीने या उमेदवारांबद्दलचे आक्षेप जोरगेवारांनी नोंदवत उमेदवार बदलण्याची मागणी केली. प्रभाग क्रमांक 4 मधून अजय सरकार आणि प्रभाग क्रमांक 3 मधून पूजा पोतराजे यांना उमेदवारी देण्याबद्दल जोरगेवार यांना तीव्र आक्षेप आहे. अजय सरकार याच्यावर 302 सहित 20 गंभीर गुन्हे दाखल असल्याचा जोरगेवार यांनी हवाला दिलाय तर दुसरीकडे पूजा पोतराजे यांचे पती मनोज पोतराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात समाज माध्यमावर बदनामी कारक कॅम्पेन चालविल्याचा जोरगेवार यांचा आरोप आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *