अजय सरकारच्या जागी शेवटच्या क्षणी प्रभाग क्रमांक 4 येथे रॉबिन बिश्वास या भाजपच्या कार्यकर्त्याला देण्यात आली उमेदवारी
चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांनी आक्षेप घेतलेल्या अजय सरकार याला पक्षाने अखेर क्षणी उमेदवारी नाकारली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अजय सरकारच्या जागी शेवटच्या क्षणी प्रभाग क्रमांक 4 येथे रॉबिन बिश्वास या भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली. तर प्रभाग क्रमांक 3 येथे जोरगेवार यांनी आक्षेप घेतलेल्या पूजा पोतराजे आणि तिकिटासाठी पक्ष श्रेष्ठीं समोर गोंधळ घालणाऱ्या चंद्रकला सोयाम या दोघांनाही पक्षाने एबी फॉर्म दिले आहेत. प्रदेश अध्यक्ष ज्या एबी फॉर्मला सर्टिफाइड करतील तोच उमेदवारी अर्ज ग्राह्य धरल्या जाईल अशी माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी याबाबत दिली. त्यामुळे सोयाम आणि पोतराजे यांच्यापैकी कोणाला भाजपची उमेदवारी मिळणार यावर उद्या म्हणजे अर्जांच्या छाननीच्या दिवशी निर्णय
होईल.
