चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या गणेश पिपरी येथे तिन वर्षीय वाघाने धुमाकुळ घातला होता. यात दोन शेतक-यांचे बळी गेले होते. वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्ध कामगिरी करत या वाघाला जेरबंद केले. यासाठी नागरिकांनी आंदोलन केले होते.
पोंभुर्णा तालुक्यातील देवई येथील शेतशिवारालगत शुटर अविनाश फुलझेले यांनी त्या वाघाला बेशुध्द केलंय. तब्बल दोन महिन्याची मेहनत कामाला आली. वाघाला प्राथमिक तपासणीनंतर अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहे.
