श्रम कायदे आणि त्याविषयीच्या सुधारणा संदर्भात केला कडाडून विरोध
कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. श्रम कायदे आणि त्याविषयीच्या सुधारणाचा मोर्चेक-यांनी कडाडून विरोध केला. कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा , 30 हजार रु किमान वेतन लागू करा,
शेतकन्यांना हमी भाव लागू करा, स्वामिनाथन शिफारस लागू करा, असंघटित, कंत्राटी, योजना अंगणवाडी, आशा, शालेय पोषण, अर्धवेळ स्त्रीपरिचार, कर्मचारीना कायम करा, महिला आरक्षण बिल त्वरित लागू करा, सर्व कामगार कर्मचारीना सामाजिक सुरक्षा लागू करा या विविध मागण्या मोर्चेकर्यांनी केल्या आहेत
