नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत RCERT च्या व्हॉलीबॉल संघाला द्वितीय क्रमांक

खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा यशात मानाची भर

चंद्रपूर : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU) अंतर्गत बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्धा येथे आयोजित नागपूर विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेतील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने द्वितीय क्रमांक पटकावत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

 

या स्पर्धेत RCERT च्या व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ, नियोजन, जिद्द आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना चुरशीची लढत दिली. खेळाडूंनी दाखविलेली चिकाटी, समन्वय आणि विजयासाठीची जिद्द यामुळे संघाला हे यश संपादन करता आले. या संघामध्ये संस्कार बोबडे (चतुर्थ वर्ष, CSE डेटा सायन्स), राजकिरण वाडगुरे (चतुर्थ वर्ष, मेकॅनिकल), संकेत झाडे (चतुर्थ वर्ष, मायनिंग), चेतन सोनटक्के (चतुर्थ वर्ष, मेकॅनिकल), साहिल घुगरे (द्वितीय वर्ष, मेकॅनिकल), सोमेश्वर झाडे (चतुर्थ वर्ष, मेकॅनिकल) आणि साहिल डोडके (तृतीय वर्ष, मेकॅनिकल) या खेळाडूंचा समावेश होता.

 

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सरदार पटेल मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यातही क्रीडा क्षेत्रात अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आदित्य आंबटकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.

 

शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातही RCERT चे विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करीत असून, या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे. खेळाडूंच्या मेहनतीचे, जिद्दीचे, शिस्तीचे आणि सांघिक भावनेचे हे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही विजयी संघाचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *