घुग्घुस शहरात नगरसेवक विवेक बोढे यांच्यातर्फे कावड यात्रेचे स्वागत

घुग्घुस: शहरात नगरसेवक विवेक बोढे यांच्यातर्फे १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजता बसस्थानक चौकात कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले. बोल बम समिती घुग्घुसतर्फे वढा येथून त्रिवेणी संगमाच्या नदीचे पाणी घेऊन पायदळ कावड यात्रा निघाली.

घुग्घुस बसस्थानक चौकात कावड यात्रा येताच नगरसेवक विवेक बोढे यांनी यात्रेत सहभागी भाविकांचे भगवा दुपट्टा टाकून स्वागत केले तसेच पाणी बॉटल, फळ व बिस्कीट वाटप केले.

वणी तालुक्यातील शिरपूर येथे कावड यात्रेचे समापन करण्यात आले. यावेळी नगरसेवक विवेक बोढे, भाजपाचे गणेश कुटेमाटे, वसंता भोंगळे, सुरेंद्र भोंगळे, सुनील राम, सुनील श्रीवास, जयराज घोरपडे, संजय मानकर, शरीफ सिद्दीकी, तुलसीदास ढवस, रंगय्या पुरेल्ली, सचिन नांदे, अनिल गुप्ता, सुनंदा लिहीतकर, हनुमान खडसे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *