प्राथमिक माहितीच्या आधारे पुढे आली आकडेवारी, प्रत्यक्ष सर्वेक्षण झाल्यावर शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली जाणार
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वच महसुली मंडळात जुलै महिन्यात अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. विशेषतः 27 ते 30 जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस आणि वर्धा नदीच्या बॅक वॉटर मुळे बहुतांश नदीकिनारी मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील कापूस- सोयाबीन -तूर -भाजीपाला पिकांचे या क्षेत्रात मोठे नुकसान झाले असून नजर अंदाज प्राथमिक माहितीनुसार 5 हजार हेक्टरहुन अधिक क्षेत्रात शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून क्षेत्र निश्चिती केली जाणार असून त्यानंतर शासकीय निकषानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे.
