घरात खुंटीला टांगलेल्या पँटमध्ये शिरला विंचू, दंश करताच 12 वर्षीय मुलाचा बीपी शून्यावर

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या विहीरगाव येथील घटना, आधी गावातच गावठी उपचार केल्याने प्रकृती खालावली, चंद्रपूरच्या डॉ. आनंद बेंदले यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले प्राण

घरात खुंटीला टांगलेली पँट अंगात घातल्यावर आत दडून असलेल्या विंचवाने दंश करताच 12 वर्षीय मुलाचा बीपी शून्यावर आला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या विहीरगावची घटना पालकांसाठी धडा ठरली आहे. त्याचे 3 दिवस अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. यात चंद्रपूरच्या डॉ. आनंद बेंदले यांनी शर्थीचे प्रयत्न करून मुलाचे प्राण वाचविले. या मुलाचे नाव अनुप ईश्वर ढोणे असे आहे. पावसाळ्याच्या दिवसात विंचू आणि साप यांच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याची गरज घटनेच्या निमित्ताने व्यक्त झाली. विशेष म्हणजे मुलाच्या पालकांनी प्रकृती अत्यवस्थ होईपर्यंत त्याच्यावर गावातच गावठी उपचार केले. त्यामुळे मुलाची तब्येत आणखी खालावली. मात्र आता चंद्रपुरात डॉ. बेंदले यांच्या इस्पितळात प्रकृती सुधारत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *