जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याने चंद्रपुरातून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना मागणी पत्रे पाठविली जाणार आहेत. आज शेकडो ओबीसी आंदोलकांच्या उपस्थितीत स्थानिक मुख्य टपाल कार्यालय परिसरात पत्र पाठविण्याच्या आंदोलनाचा प्रारंभ झाला.
केंद्र सरकारनेच मान्य केलेली बाब आता प्रत्यक्ष लेखी स्वरूपात दिसत नसल्याने ओबीसींचा संताप वाढला आहे. आगामी काळात विविध आंदोलनांच्या माध्यमातून केंद्र सरकारचे याकडे लक्ष वेधले जाणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास जनगणनेत सहकार्य न करण्याचा इशारा देण्यात आलाय.
