चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत नव्याने अमृत २.० योजनेचे काम सुरु करण्यात आले आहे, सदर काम हे खासगी कंत्राटदाराला देण्यात आले असून त्यावर देखरेख करण्याचे काम हे महाराष्ट्र जल प्राधिकरणाचे आहे. मात्र अमृतच्या कामात निकृष्ट दर्जाचे काम करण्याचा सपाटा कंत्राटदाराने लावला आहे, याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी मनपा आयुक्त व मजीप्रा ला याबाबत निवेदन वर्ष २०२५ ला दिले होते. त्यावर कारवाई करण्याचे सोडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, त्यानंतर सहारे यांनी स्मरणपत्र दिले होते.
सहारे यांच्या पाठपुराव्यानंतर मनपा आयुक्त आकनुरी नरेश यांनी स्पॉट पंचनामा केला, त्यावेळी त्यांनी कंत्राटदाराची चांगलीच कानउघाडणी केली होती, मात्र मजीप्रा च्या अधिकाऱ्यांनी यावर ब्र सुद्धा काढला नाही. कंत्राटदार व मजीप्रा यांचे या कामात आर्थिक हितसंबंध तर नाही न असा संशय उपस्थित झाला आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामाला मजीप्रा चा पाठिंबा दिसून येत आहे, मनपा आयुक्तांनी चांगले गुणवत्तापूर्ण काम करावे असे निर्देश दिले मात्र त्यानंतरही कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे. म्हणून विक्रांत सहारे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्य अभियंता महाराष्ट्र प्राधिकरण नागपूर यांना निवेदनाद्वारे चंद्रपुरातील निकृष्ट कामातील भागीदार मजीप्रा अधिकाऱ्यांची चौकशी करीत निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. येत्या काही दिवसात सदर प्रकरणी चौकशी लागेल असा सकारात्मक प्रतिसाद उपमुख्यमंत्री शिंदे , डॉ. के. एच. गोविंद राज अप्पर मुख्य सचिव नगर विकास मंत्रालय व मुख्य अभियंता मजीप्रा यांनी दिले आणि येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चंद्रपूर कार्यालयातील जबाबदार अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही झाली नाही तर युवा सेना चंद्रपूर यांच्यामार्फत तीव्र शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर विक्रांत सहारे यांच्याकडून देण्यात आला सदर निवेदन देते वेळेस संदीप रियाल पटेल युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक, संजय ठाकूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष यांची प्रामुख्याने उपस्थिती होती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *