ट्रक दरीत कोसळून २२ मजूर ठार

वृत्तसंस्था अरुणाचल प्रदेश, दि. ११ : अरुणाचल प्रदेशातील अनजाँ जिल्ह्यातील हुलीयॉंग परिसरात एक ट्रक हजार फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक आणि क्लिनरसह २२ जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकाला २८ मृतदेह सापडले, ही माहिती आज समोर आली.

अपघातात एक व्यक्ती जिवंत वाचला होता, जो दोन दिवस पायी चालत कसारारी आर्मी कॅम्पमध्ये पोहोचला. त्यानंतर आज सकाळी लष्कराचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.

पथकाला घटनास्थळी पोहोचायला १० तासांपेक्षा जास्त वेळ लागला. अपघातात जखमी झालेला व्यक्ती मोठ्या प्रयत्नाने दरीतून बाहेर आला आणि हुलीयॉंग चगमलागम रस्त्यावर पोहोचला. दोन दिवस पायी चालत दिसेम्बराच्या रात्री चिपरार कॅम्पमध्ये पोहोचला. तिथे त्याने जवानांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी सकाळी लष्कराने बचावकार्य सुरू केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *